- विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शशिकांत मांजरे सरांचा स्नेहसोहळा

- आष्टा– ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता. भूम जि.धाराशिव येथे विद्यार्थीप्रिय गणित शिक्षक शशिकांत मांजरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या लाडक्या गुरुजींचा वाढदिवस निमित्ताने शाळेत आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. 
मांजरे सरांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून आपल्या आवडत्या सरांचा सत्कार केला. विद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना अभिष्टचिंतन करण्यात आले.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आणि गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणारे मांजरे सर यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.या स्नेहसोहळ्यामुळे शाळेत आनंद व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.



More Stories
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली स्वयंशासन दिन उत्साहात
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन