March 26, 2026

संभाजी विद्यालयात गुरुजींच्या प्रतिमापूजनाने नववर्षाची प्रेरणादायी सुरुवात

  • पिंपळगाव (लिंगी) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ जानेवारी २०२६ वार गुरुवारी संभाजी विद्यालय येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
    या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले, संतोष बोडके,सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे, फुरडे एल.आर.आदी मान्यवर उपस्थित होते.
    या कार्यक्रमातून शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यवर्धनाचे कार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!