August 8, 2025

टीसी काढण्यासाठी गेलेल्या युवकाला शिक्षकांकडून मारहाण; आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनची मागणी

  • लातूर – अहमदपूर तालुक्यातील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणीची शाळा सोडण्याची प्रमाणपत्र (टीसी) काढण्यासाठी गेलेल्या युवकाला शिक्षक व मुख्याध्यापक यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पीडित विद्यार्थिनीने भावावर होत असलेली मारहाण मोबाईलमध्ये चित्रीत करत असताना शिक्षकांनी तिच्यावरही धक्काबुक्की केली आणि मोबाईल हिसकावून घेतला.
    या प्रकारानंतर पीडित विद्यार्थ्यांवरच शाळेच्या वतीने ३५३ सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजते. मात्र, अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.
    या घटनेचा निषेध करत लातूर जिल्हाधिकारी यांना भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन लातूरचे शहराध्यक्ष सागर साखरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यामध्ये आरोपी शिक्षक व मुख्याध्यापक यांना तातडीने अटक करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडित विद्यार्थिनी व तिच्या भावावर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
    पीडित विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही सागर साखरे यांनी दिला.
    यावेळी भीम आर्मी मराठवाडा निरीक्षक अक्षयजी धावारे,माजी मराठवाडा अध्यक्ष विनोदजी कोल्हे,लातूर जिल्हा संघटक सोनू घोडके,अक्षय गायकवाड,मारुती कावळे,अमोल गेजगे,आदित्य कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!