धाराशिव (जिमाका) -‘विकसित भारत @२०४७’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दीर्घकालीन विकास आराखड्याची आखणी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध क्षेत्रांतील – आरोग्य,शिक्षण,रोजगार,पायाभूत सुविधा आणि सेवांबाबत – सूचना,अपेक्षा आणि कल्पना जाणून घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये,स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय/निमशासकीय अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमातून मिळणाऱ्या मतांवर आधारित भविष्यकालीन ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दृष्टीकोन आराखड्याची रचना करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वापरावी: https://wa.link/o93s9m नागरिकांनी यावर आपले मत नोंदवावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपले मौल्यवान विचार व सूचना नोंदवून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला