August 8, 2025

डॉ.अशोकराव मोहेकर यांचा अमेरिका दौऱ्यानंतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव, शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर स्वदेशात आगमनानिमित्त, दि.१६ जुलै २०२५ रोजी त्यांचा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
    हा सत्कार प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.डॉ.अशोकराव मोहेकर यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यातील शैक्षणिक निरीक्षण आणि अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
    कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे अधीक्षक जाधव हनुमंत,तसेच वाळजकर दत्तात्रय,मुंढे अरुण, भालेकर रमेश,देशमुख नेताजी, पाटील,डिकले बालाजी,शेळके भारत,सावंत कालिदास आदी कर्मचारी उपस्थित होते.
    या सन्मानाने शिक्षणप्रेमी कर्मचारी वर्गामध्ये प्रेरणा निर्माण झाली असून,संस्थेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याला अधिक बळ मिळेल,असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!