परंडा – विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी.आपल्या आई-वडिलांना फसवू नये . आई-वडिलांनी आपल्यावर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात . स्पर्धेच्या युगात जगत असताना प्रमाणिकपणे अभ्यास करून आपले व आपल्या आई वडिलांचे नाव समाजामध्ये करावे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी कै. रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परंडा येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव जगताप उपस्थित होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वसंतराव जगताप यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी दहावीनंतर चा प्रवास कसा असेल यासंदर्भात मुलांना पुढील शिक्षणासाठीचे मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील मुलांनी निरोप समारंभात भाषणे केली.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सांगळे एस.एस यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेतील शिक्षक पौळ एस.एस,पाटील व्ही.एन,जाधव बी.ए,येमले डी. पी,वडतिले ए.एस,सांगळे एस. एस,करंडे एस.बी,सक्राते व्ही. बी,कुलकर्णी आदी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सक्राते व्ही.बी यांनी केले तर आभार पाटील व्ही.एन यानी मानले.
More Stories
तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे
भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा