कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब येथे विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका प्रा.अंजलीताई मोहेकर उपस्थित होत्या.आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. अभ्यासामध्ये नियमितता असावी.याप्रसंगी डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये दर्शन जनार्दन भामरे हा विद्यार्थी राज्यस्तरीय प्रात्यक्षिक परीक्षा मधून मुलाखतीसाठी पात्र ठरला आहे.त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परीक्षेमध्ये इयत्ता आठवी मधून लोंढे साक्षी, लोमटे साक्षी,हौसलमल प्रणिती, तांबारे पार्थ,गायकवाड पायल, शिंपले सायली,अडसूळ श्रावणी, ठोंबरे पियुष,पवार कल्याणी आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.राज्यस्तरीय स्क्वॅश मध्ये यश मिळवल्याबद्दल शिंदे विनय,शिंदे विवेक,नांगरे वसुंधरा,तसेच भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उदय हरीश काळे (गोल्ड मेडल),तांबारे पार्थ प्रमोद (सिल्वर मेडल),ठोंबरे पियुष सुरेश (ब्रांझ मेडल),राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये शिंदे सायली,टोपे तन्वी,टोपे सृष्टी, काळे साक्षी,माहेश्वरी जमादार, थोरबोले नेहा,बिरसा उबाळे यांचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी,उपमुख्याध्यापक मायाचारी विक्रम,पर्यवेक्षिका डॉ.जे.एन. कोळी,रोहिणी मोहेकर आदी उपस्थित होते.भूगोल प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा मार्फत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशाल पवार यांचेही अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सतीश कानगुडे, ढोले विजयकुमार,विज्ञान शिक्षक विनोद सागर आदींचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पवार एस.जे.यांनी केले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे