September 20, 2026

तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे

  • परांडा – तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे.ज्यामुळे जगभरात कर्करोगामुळे सुमारे २ .५ दशलक्ष मृत्यू होतात.तंबाखूमुळे अर्धविकार कर्करोग आणि श्वसन रोग तसेच इतर अनेक दुर्बल आरोग्य परिस्थितीसाठी एक प्रमुख घटक मानला जातो . आरोग्यासाठी तंबाखू हानिकारक आहे त्यामुळे फुफुसाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग घशाचा कर्करोग असे अनेक रोग होतात.त्यामुळे तंबाखूचे सेवन टाळणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे असे मत प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले.शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा आणि पोलीस ठाणे परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ मे २०२५ रोजी महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव व उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, पोलीस निरीक्षक डी.बी.पारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी पोलीस निरीक्षक पारेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनाच्या संदर्भात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास आरोग्य कसे धोक्यात येते यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
    पुढे बोलताना डॉ.शहाजी चंदनशिवे म्हणाले की,तंबाखूतील अनेक घटकामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात ब्लॉकेजची शक्यता वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता वाढते.तंबाखूच्या वापरामुळे हृदय यकृत आणि फुफ्फुसावर परिणाम करणारे आजार सर्वात जास्त होतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहिले पाहिजे, व्यसनापासून दूर राहिले पाहिजे तरच आपले आरोग्य टिकेल.घरामधील आपले कोणी सदस्य तंबाखू खात असतील, सिगारेट गांजा दारु पीत असतील त्यांना त्याचे परिणाम सांगून त्यांनाही तंबाखूमुक्त व्यसनमुक्त केले पाहिजे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.प्रशांत गायकवाड,डॉ.कृष्णा परभणे यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!