परांडा – श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परांडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. सचिन चव्हाण,प्रा.संभाजी धनवे व प्रा.शंकर अंकुश यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये वाचन करून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळी प्रा.शंकर अंकुश यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन वाचन किती महत्त्वाचे आहे वाचनामुळे माणूस कसा घडतो या संदर्भात आपले व्याख्यान दिले तर प्रा.संभाजी धनवे यांनीही विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक मात्र जगातील व्यक्ती आहेत.ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधले म्हणून प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली.या देशाची राज्यघटना लिहिली. संविधानामुळे व डॉ.बाबासाहेबांनी घेतलेल्या शिक्षणामुळे समस्त मानव जातीचे कल्याण झाले.त्यांचे विचार केवळ भारत देशाने नव्हे तर जगाने आत्मसात केले म्हणून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेबांची जयंती ही केवळ एका देशातच नव्हे तर 150 देशांमध्ये साजरी केली जाते. विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते सांगितले.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा डॉ.बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश समस्त मानव जातीसाठी प्रेरणा देणार आहे.शिक्षणामुळे माणसांना आपल्या कर्तव्याची जाणीव होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.
More Stories
तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे
भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त मानव जातीसाठी महान कार्य केले – डॉ.शहाजी चंदनशिवे