कळंब – धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना नेते अजित (दादा) पिंगळे यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.अतिदुर्गम लिंगाणा किल्ल्यावर चढाई करून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना थरारक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गिर्यारोहक आकाश कोळी, रितेश बनसोडे,कृष्णा मरगळे, अनंता कोकरे आणि प्रदीप यांनी ही अद्वितीय चढाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. Adventure Junction Trekking Team च्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांमध्ये एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. या संपूर्ण मोहिमेचे शिवसेना नेते अजित (दादा) पिंगळे यांनी विशेष कौतुक करत साहस आणि निसर्गप्रेमाच्या संगमातून घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचे अभिनंदन केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले