August 8, 2025

४ व ५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

  • धाराशिव (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने जिल्हास्तर युवा महोत्सव २०२४ चे आयोजन ४ ते ०५ डिसेंबर २०२४ दरम्यान छत्रपती शिवाजी नाट्यगृह,धाराशिव येथे करण्यात आले आहे.
    या जिल्हास्तर युवा महोत्सवात संकल्पना आधारित बाबीमध्ये “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” “Innovation on Science and Technology” सांस्कृतिक कार्यक्रम (यात समुह लोकनृत्य,लोकगीत,कौशल्य विकास कार्यक्रम (कथालेखन,चित्रकला, वक्तृत्व,कविता व फोटोग्राफी) युथ आयकॉन कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
    या जिल्हा युवा महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभागी होवू शकतील (दि.१२ जानेवारी २०२५ रोजी वयाची परिगणना १५ ते २९ असावी ) जन्म तारखेबाबत सबळ पुरावा म्हणुन जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे.जिल्हयाचा रहिवासी असल्याबाबत आधारकार्ड / रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे.
    सन २०२४-२५ या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या आयोजनाकरिता आपली नाव नोंदणी बाबनिहाय विहित नमुन्यातील अर्जासह २ डिसेंबर-२०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, धाराशिव येथे प्रत्यक्ष किंवा districtsports.osmanabad@gmail.com या ई-मेल आयडीवरती पाठविण्यात यावी.अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी बी.के.नाईकवाडी, यांच्याशी ९२८४०६१७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
error: Content is protected !!