August 8, 2025

सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षक भरतीसाठी कागदपत्रांसह उपस्थित राहावे

  • धाराशिव (जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव येथे कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक महामंडळ मर्या (मेस्को),पुणेतर्फे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावयाची आहे.आकर्षक मासिक पगार,दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता,कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ.,ई.एस.आय.,ग्रॅज्युएटी इत्यादी फायदे.माजी सैनिक,माजी सैनिक विधवा,माजी सैनिक पाल्य व निमलष्करी सेनामधील निवृत्त कर्मचाऱ्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांक-०२४७२-२२२५५७ किंवा या क्रमांकावर-७५८८५२७५५४,गंगाधर गायकवाड ९४२२३०७५९३ यांच्याशी संपर्क साधावा.तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे आपल्या सर्व मूळ कागदपत्रासह २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता या वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
error: Content is protected !!