June 25, 2026

सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

  • लातूर – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साई धनवर्षा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘समाजरत्नांचा सत्कार सोहळा’ यंदाही उत्साहात पार पडला.या सोहळ्यात शिक्षण,सामाजिक कार्य,आरोग्य,शेती,प्रशासन, पत्रकारिता,सांस्कृतिक,राजकीय व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    यावेळी लातूर जिल्ह्यातील समाजसेवक सुफी सय्यद शमशोद्दीन चांदसाहेब भिसे वाघोलीकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    महिला परिचारिकांच्या न्याय व हक्कांसाठी केलेले आंदोलन, तसेच गरजू व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेला संघर्ष यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
    या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते संजय विजय देशमुख यांनी केले होते. कार्यक्रमास ब्रह्माकुमारी संस्थेच्या सरला बेन यांच्यासह नाशिक व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दिवसभर सुरू असलेल्या या सोहळ्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांतील समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    दरम्यान,सुफी सय्यद शमशोद्दीन यांना यापूर्वीही विविध राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड, पुणे येथे भारत गौरव पुरस्कार,मुंबई येथे कर्तव्यदक्ष आदर्श समाजसेवक पुरस्कार, चंद्रपूर-भद्रावती येथे संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार तसेच दिल्ली येथे सुभाषचंद्र बोस आयकॉन अवॉर्ड अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
    सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लातूर जिल्ह्यासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
error: Content is protected !!