June 23, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 144 कारवाया करुन 1,19,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-छगन सोमा पवार, वय 51 वर्षे, रा.वरुडा पारधी पिढी ता. जि. धाराशिव हे दि.30.10.2024 रोजी 08.30 वा. सु. आपल्या पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 19,800 ₹ किंमतीची 105 गावठी दारु व गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 400 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सुनिता नागेश गुत्तेदार, रा. अंबेजवळगे ता. जि. धाराशिव या दि.30.10.2024 रोजी 18.30 वा. सु. आपल्या पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 10,400 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 200 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-रावसाहेब भिकाजी खांडेकर, वय 52 वर्षे, रा. वडणेर ता. परंडा जि. धाराशिव हे दि.30.10.2024 रोजी 11.35 वा. सु. आपल्या पत्र्याचे शेडलगत अंदाजे 2,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-राजकुमार निलाप्पा कोळी, वय 27 वर्षे, रा. कुंभारी द., ह.मु. महादेव नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.30.10.2024 रोजी 18.00 वा. सु. दंळीब येथे भाउसाहेब मुरुमे यांचे घराजवळ अंदाजे 15,000 ₹ किंमतीचे सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-साखरबाई मोतीराम पवार, रा. मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव या दि.30.10.2024 रोजी 18.15 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 21,000 ₹ किंमतीचे 350 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “शस्त्र कायद्यांतर्गतगुन्हा नोंद.”
    येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-बालाजी देविदास वाघमारे, वय 25 वर्षे, रा.पानगाव ता. कळंब जि.धाराशिव, यांनी मा.जिल्हादंडाधिकारी साहेब धाराशिव यांचे शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करुन अंदाजे 2,000₹ किंमतीची एक तलवार बेकायदेशीररीत्या जवळ बाळगलेले येरमाळा पोलीसांना दि.30.10.2024 रोजी 13.30 वा. सु. पानगाव शिवारातील शेत गट नं 138 मध्ये मिळून आला. यावरुन पथकाने नमुद तलवार जप्त करुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द भा.न्या.सं. कलम 223 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 सह मपोका कलम 135 अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “अवैध गुटखा विक्री करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
    नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-प्रकाश देवबा गायकवाड, वय 54 वर्षे, रा. आरळी खु., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 30.10.2024 रोजी 18.00 वा. सु. बसस्थानक आरळी खु., येथे प्रविण किरणा स्टोअर्स दुकानात पान मसाला, विमल गुटखा, व तंबाखु असा एकुण 47,606 ₹ किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु, पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला नळदुर्ग पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी भा.न्या.सं. कलम 123, 274, 275, 223सह अन्न सुरक्षा आणि मानके अधि 2006 कलम 59 अन्वये नळदुर्ग पो.ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • बेंबळी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-पोपट संदीपान यादव, वय 48 वर्षे, रा. पाटोदा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000₹ किंमतीची हिरो होंडा मोटरसायकल क्र एमएच 25 बी.बी. 1394 ही दि. 09.10.2024 रोजी 23.00 ते दि. 10.10.2024 रोजी 05.00 वा. सु. पोपट यादव यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पोपट यादव यांनी दि.30.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • बेंबळी पोलीस ठाणे: मयत नामे-फुलसिंह धनसिंह, व सोबत फिर्यादी नामे- अजय भवनसिंह उर्फ मोहन मानकरे (सोलंकी),वय 20 वर्षे, दोघे रा. हिरापूर ता. उदयनगर जि. दिवास राज्य मध्येप्रदेश ह.मु. रविंद्र बिडवे यांच्या शेतात कामेगाव ता.जि. धाराशिव हे दि. 26.10.2024 रोजी 21.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 45 एल 1190 वरुन जात होते. दरम्यान पिकअप वाहन क्र एमएच 25 ए.जे.1190 चा चालकाने आरोपी नामे-नामदेव भगवान पुजारी, रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील पिकअप हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून फुलसिंह धनसिंह यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात फुलसिंह धनसिंह हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अजय मानकरे हे जखमी झाले. तसेच नमुद पिकअप चालक हा अपघात करुन अपघाताची माहिती न देता अपघात स्थळावरून वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजय मानकरे यांनी दि.30.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(बी),106(1) सह 184, 134 (अ) (ब) मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • बेंबळी पोलीस ठाणे :एका गावातील एक 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)एक वर्षा पासून ते दि. 29.10.2024 रोजी पावेतो ही घरी असताना गावातील एका तरुणाने तिस तु मला खुप आवडतेस मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे.असे अमिष दाखवून नमुद तरुणाने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन पिडीतेन यांनी दि. 30.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64(2)(एच),64(2)(एम),351(2)(3) अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1) (आर), 3(1)(एस), 3(1) (डब्ल्यु) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-शंकर हरीदास डोके, वय 40 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 29.10.2024 रोजी 20.30 वा. सु. गणपती मंदीराचे ओट्यावर सावरगाव येथे फिर्यादी नामे- परमेश्वर मल्लिकाअर्जुन स्वामी, वय 48 वर्षे, रा.सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दाताने चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-परमेश्वर स्वामी यांनी दि.30.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!