लातुर– लातुर येथे दि.२९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “गौरव कर्तव्यांचा सत्कार समाजसेवकांचा” या भव्य महोत्सवात ईटकूर येथील समाजसेवक सुधाकर रणदिवे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.समाजकार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.या सत्राचे उद्घाटन माजी खासदार डॉ.प्रा.ॲड.सुनील गायकवाड आणि अभिनेत्री व निर्माती सुनंदा वसंत तुगावकर-शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मीनाक्षी पाखरे,अभिजीत शिंदे,रामचंद्र तांदळे,अनेश खान पठाण, सिद्धार्थ कवठेकर,शितल बलदोटा आदी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांत श्री गणेश नृत्य,“मी रमाई बोलते”,“मा. साहेब जिजाऊ”,“बाल शिवबा पाळणा”,“मी सावित्री ज्योती बोलते”,देशभक्तीपर सादरीकरण, संमिश्र गीत,लावणी नृत्य तसेच शाहीर रामानंद मोरे व रत्नदीप घाडगे यांचे प्रभावी सादरीकरण यांचा समावेश होता.या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.प्रा.ॲड.सुनील बळीराम गायकवाड होते.प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर बावरकर, आशाताई सुशीलकुमार चिकटे, ॲड.लक्ष्मणराव शिंदे,बाळकृष्ण पवार पळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सुधाकर रणदिवे यांचा गौरव करण्यात आला. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महादेव गपाट व प्रा.सुरज मांदळे यांनी केले,तर आभार प्रदर्शन ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ (कळंब) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उषाताई धावारे, चंद्रकांत वायाळ,संतोष सोनवणे, आकाश कांबळे,गुलाम शेख, साहिल शेख आदींनी विशेष सहकार्य केले.या महोत्सवाचे मुख्य आयोजक व संयोजक, तसेच महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे संस्थापक सचिव सुफी सय्यद शमशोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. समाजसेवेतील योगदानाची दखल घेत रणदिवे यांचा झालेला सन्मान हा कळंब तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो