August 8, 2025

नाला खोलीकरणातून मंगरूळ गाव झाले पाणीदार

  • कळंब – तालुक्यातील मंगरूळ गावात पाणलोट विकास कामांतर्गत वॉटर व ग्रामविकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व इंडसइंड बँक यांच्या अर्थसहाय्यातून गावामध्ये 3.2 किलोमीटर नाला खोलीकरण, 5 जाळी गॅबियन, 6 लूज बोल्डर स्ट्रक्चर, 15 हेक्टर बांधबंधिस्ती, इत्यादी काम मार्फत 4.21कोटी लिटर पाणी साठवण क्षमता तयार करण्यात आली.
    यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने पाणलोटाच्या कामांमध्ये चांगलेच पाणी उभारले आहे याचा परिसरातील बोअरवेल,विहिरींना फायदा होत असून मंगरूळ गाव पाणीदार होण्यास मदत होणार आहे.
    मंगरूळ शिवारातील सर्व ओढे, नाले, नदी, तलाव पाणीदार करण्यासाठी ग्रामविकास समिती, वॉटर शेड यांच्या सहकार्य व इंडसइंड बँकेच्या अर्थसहाय्याने पाणलोट विकास कामे पूर्ण करण्यात आली.
    या खोलीकरणामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठवून ते जमिनीखालील मुरण्यास मदत होत आहे. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
error: Content is protected !!