संभाजीनगर – भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक प्रो. योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. उल्का महाजन व इतर वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी ‘आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. “आम्ही उत्तरे देऊ, सर्व भाषणे होऊ देत.” अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले, त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली. ज्या वेगाने हे घडले, त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उल्का महाजन व योगेंद्र यादव यांना संरक्षण देऊन बाहेर काढले. भारत जोडो अभियानातर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या माहितीनुसार ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते असे कळते.वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील तसेच संविधान विरोधी शक्ती,भाजप, व संघासारख्या उजव्या शक्तींशी लढताना शत्रू-मित्र विवेक बाळगतील अशी अपेक्षा आहे. जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत अशा साहित्यिक,विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा अलिकडच्या काळात वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी नवाच पॅटर्न तयार केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवैधानिक हक्काची अशी पायमल्ली वंचितांचं राजकरण करू पाहणाऱ्या पक्षाने करणे यासारखी शोकांतिका नाही. अशाप्रकारच्या हुल्लडबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलीस यंत्रणेने असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.अशाप्रकारच्या दडपशाहीला न भिता भारत जोडो अभियान आपले काम राज्यभरात सुरू ठेवेल असा आम्ही निर्धार व्यक्त करतो. मात्र असे कीतीही अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला तरी, भा.जो.अ.आपले काम सनदशीर, शांतता व अहिंसक मार्गाने सुरूच ठेवेल यात तिळमात्र शंका नाही. हमला चाहे जैसा होगा, हाथ हमारा नहीं उठेगा *संविधान बचाव, देश बचाव अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या पत्रकावर खालील मान्यवरांची नावे आहेत अँड.प्रकाश परांजपे ( निवृत्त जिल्हा न्यायाधीश…) ,अँड.डी. आर.शेळके ( निवृत्त जिल्हा न्यायाधीश…)साथी सुभाष लोमटे, जय किसान आंदोलन – स्वराज अभियान,साथी मुजताबा फारुख ( मुस्लिम सोशल फोरम…),प्रा.एच.एम.देसरडा ( ज्येष्ठ अर्थतज्ञ),साथी भाऊसाहेब पठाडे( व्यसन मुक्ती अभियान),साथी रामचन्द्र काळे, जय किसान आंदोलन – स्वराज अभियान,अँड.सुभाष सावंगीकर, मराठवाडा लेबर युनियन … अँड. विष्णू ढोबळे, समाजवादी जन परिषद,अँड.सेवकचंद बाखरिया,ज्येष्ठ विधीज्ञ, प्रा.सुभाष महेर,संविधान बचाव देश बचाव अभियान,प्रा.मच्छिंद्र गोरडे, महाराष्ट्र गांधी निधी,डॉ.शेख इक्बाल मिन्ने, अमन कमिटी,प्रा.श्रीराम जाधव,जिल्हा सर्वोदय मंडळ, प्रा. प्रकाश दाने राष्ट्र सेवा दल ,प्रा.गीता कोल्हटकर, जिल्हा सर्वोदय मंडळ,कॉ. भगवान भोजने ( मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष…)रमाकांत पाठक, ( ज्येष्ठ गांधीवादी…)साथी ज्ञानेश्वर वाघचौरे, जय किसान आंदोलन – स्वराज अभियान,साथी शेख खूर्रम स्वराज अभियान, साथी छगन गवळी, मराठवाडा लेबर युनियन,साथी अली खान मराठवाडा लेबर युनियन ,साथी देवीदास किर्तीशाही, मराठवाडा लेबर युनियन साथी जीवन राठोड ( महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटना..) *साथी सुभाष घोडके ( भारत जोडो अभियान, धाराशिव..)* *प्रा. सुधीर अनवले, प्रा. सुधीर देशमुख,, साथी गणपत पाटील, साथी राजकुमार होळीकर* ( भारत जोडो अभियान, लातूर.)… *प्रा. अर्जून जाधव* ( स्वराज इंडिया, लातूर..) *साथी दत्ता तुमवाड/ प्रा. शेख शकीला../ डॉ. प्रताप परभकर* ( भारत जोडो अभियान, नांदेड..).. *साथी संग्राम नायक, साथी अतूल नायक* ( भारत जोडो अभियान, हिंगोली..) *डॉ. सुनिल जाधव* ( भारत जोडो अभियान, परभणी..)… *अड. डी. के कुळकर्णी* ( भारत जोडो अभियान, जालना…,) *साथी बळवंतराव मोरे* ( प्रदेशाध्यक्ष, शेतकरी शेतमजूर पंचायत…) *सुबेदार मेजर सुखदेव बन* ( श्रमिक मुक्ती दल, औरंगाबाद…) घोडके* ( भारत जोडो अभियान, धाराशिव..) *प्रा. सुधीर अनवले, प्रा. सुधीर देशमुख,, साथी गणपत पाटील, साथी राजकुमार होळीकर* ( भारत जोडो अभियान, लातूर.)… *प्रा. अर्जून जाधव* ( स्वराज इंडिया, लातूर..) *साथी दत्ता तुमवाड/ प्रा. शेख शकीला../ डॉ. प्रताप परभकर* ( भारत जोडो अभियान, नांदेड..).. *साथी संग्राम नायक, साथी अतूल नायक* ( भारत जोडो अभियान, हिंगोली..) *डॉ. सुनिल जाधव* ( भारत जोडो अभियान, परभणी..)… *अड. डी. के कुळकर्णी* ( भारत जोडो अभियान, जालना…,) *साथी बळवंतराव मोरे* ( प्रदेशाध्यक्ष, शेतकरी शेतमजूर पंचायत…) *सुबेदार मेजर सुखदेव बन* ( श्रमिक मुक्ती दल, औरंगाबाद…)
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण