धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 195 कारवाया करुन 1,71,050 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.22.10.2024 रोजी 18.50 वा. सु.धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत नाज हॉटेल चे बाजूस पाथरुड चौक धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शिवम सिकंदर मंजुळे, वय 24 वर्षे,रा. विद्यानगर निलंगा ता. निलंगा जि. लातुर ह.मु पाथरुड चौक धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.50 वा. सु.नाज हॉटेल चे बाजूस पाथरुड चौक धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे :दि.21.10.2024 रोजी 23.00 वा. सु. फिर्यादी नामे-विठ्ठल सर्जेराव शिंदे, वय 62 वर्षे, रा. घर क्र 923 लोणी ता. परंडा जि. धाराशिव हे लोणी येथील घरात झोपले असता अचानक टो असा आवाज आल्याने फिर्यादी त्यांची पत्नी व मुलगा यांनी बाहेर येवून पाहिले असता अनोळखी चार इसम मोटरसायकलवर बसून पळून गेले. तसेच फिर्यादी यांना बंदुकीच्या गोळीचा पुडील भाग, रिकामी पुंगळी व कत्ती मिळून आली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विठ्ठल शिंदे यांनी दि.22.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे शस्त्र अधिनियम 5, 27 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सूर्यकांत विनायक पांचाळ, वय 38 वर्षे, रा.पारा ता. वाशी जि. धाराशिव यांचे घरासमोरील जेमेणीकंपनीच्या शिलाई मशीनचा गट अंदाजे 6,000₹ व सुर्यकांत पांचाळ यांचे गावातील पदमीण ज्ञानोबा ढेंगळे यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 20,000₹ रोख रक्कम असा एकुण 26,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुर्यकांत पांचाळ यांनी दि.22.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-आसावरी संतोष कुलकर्णी (वरुडकर), वय 47 वर्षे, रा. नेहरु चौक धाराशिव ता. जि.धाराशिव या धाराशिव बसस्थानक येथे धाराशिव ते लातुर बस मध्ये चढत असतानाअज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून आसावरी कुलकर्णी यांचे गळ्यातील 82 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोप गठंण अंदाजे 1,65,000₹ किंमतीचे हे दि.22.10.2024 रोजी 14.00वा. सु.चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आसावरी कुलकर्णी यांनी दि.22.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंनदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-विठ्ठल आप्पा मारकड, माउली बाबु मारकड,सोनाली विठ्ठल मारकड,अंजली दादा मारकड सर्व रा. दुधोडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.20.10.2024 रोजी 07.00 वा. सु. दुधोडी शिवार येथे फिर्यादी नामे-अजित शिवाजी शेंबडे, वय 17 रा. दुधोडी ता.भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित शेंबडे यांनी दि.22.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2),352,351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
भुम पोलीस ठाणे: मयत नामे-दिपक साहेबराव वाघमारे, वय 42 वर्षे, रा.कोरेगाव ता. बार्शी जि. सोलापूर हे दि.13.10.2024 रोजी 19.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 07 डी 7166 वरुन डीवायएसपी ऑफीस भुम समोरुन जात होते. दरम्यान जेसीबी क्र एम.एच 22 बीसी 0759 चा चालकाने त्याचे ताब्यातील जेसीबी हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून दिपक वाघमारे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दिपक वाघमारे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तारामती दिपक वाघमारे, वय 40 वर्षे, रा. कोरेगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.22.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला