August 8, 2025

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार युवकांनी आत्मसात करावेत – प्रा.श्रीकांत पवार

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – भारताला नवी दिशा दाखवणारे महान शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन,भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांनी सर्वसामान्य जीवनातून आपल्या हुशारीवर राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली असे प्रतिपादन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी केले.
    धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रा.श्रीकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.

  • यावेळी प्रा.पवार हे बोलत होते ते पुढे म्हणाले की,भारतीय वैज्ञानिक आणि अंतराळ क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान देत पृथ्वी, अग्नी आणि आकाश या प्रक्षेपणांच्या संशोधनामध्ये महत्वाची भूमिका निभावली. आपल्या प्रेरणादायी भाषणांमुळे त्यांनी नेहमीच भारतीयांना, विशेषतःतरुणांना प्रेरित केले.
    यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पालक महादेव वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर आभार निदेशक अविनाश म्हत्रे यांनी मानले.
    याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!