August 8, 2025

राहुल यादव यांना पुस्तके देवून अभिष्टचिंतन संपन्न

  • शिराढोण – सामाजिक कार्यकर्ते निलेश नाईकवाडे यांनी वाढदिवसानिमित्त शिराढोण गावातील सजग युवकांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर डिजिटल,केक,हार,फेटा न वापरता सामाजिक चळवळीतील पुस्तके सप्रेम भेट देवून अभिष्टचिंतन साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
    त्यानुसार राहुल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतातील स्वातंत्र्याचे दोन आंदोलने हे ओहोळ डी.आर या लेखकाचे पुस्तक सप्रेम भेट दिले.
    याप्रसंगी अँड.नितीन पाटील, डॉ.अमोल पाटील,निलेश नाईकवाडे,अमोल नाईकवाडे, मिलिंद नाईकवाडे,विक्रम नाईकवाडे,धम्मपाल गोरे,किरण नाईकवाडे,उमेश नाईकवाडे, राकेश सरवदे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!