धाराशिव (जिमाका) – कळंब तालुक्यातील घारगाव येथील डॉ.महेंद्र घाटूळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०२३ मध्ये घेतलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी त्यांच्या कक्षात डॉ.महेंद्र घाटुळे यांचा गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन सत्कार केला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव तसेच डॉ.महेश यांची आई, वडील व बहीण उपस्थित होते. सर्वसाधारण कुटुंबातील डॉ.महेश यांनी प्राथमिक शिक्षण घारगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पूर्ण केले.माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथील गुरुदेव विद्यालय येथे,उच्च माध्यमिक शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय आणि सन २०१९ मध्ये नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएस शिक्षण पूर्ण केले.स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी डॉ.महेंद्र घाटुळे यांनी शिकवणी वर्ग न लावता पुणे येथे स्वतःच अभ्यास केला.जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी डॉ.महेंद्र घाटूळे यांचा सत्कार करून अभिनंदन केले व यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन