कळंब – कळंब तालुक्यातील घारगाव येथील सामान्य कुटुंबातील डॉ.महेश घाटुळे यांनी पहिल्याच प्रयत्नात एम.पी.एस. सी स्पर्धा परीक्षा क्रॅक करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आणि उपजिल्हाधिकारी पदा पर्यंत गरूड झेप घेतली.त्यांनी कोणत्याही प्रकारची कोचिंग न लावता स्वतःस्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. तसेच कु.मयुरी मणके हिने यावर्षी निट परिक्षेत उत्तम गुण मिळवून धाराशिव येथील शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळविला. या दोन्ही ही यशवंत आणि गुणवंतांचा कळंब तालुका सकल धनगर समाज आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत येथील बालरोगतज्ञ व प्रबोधन मंचचे संचालक डॉ.रामकृष्ण लोंढे,डॉ.सत्यप्रेम वारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्काराला उत्तर देताना दोघांनी ही कठोर परिश्रम,जिद्द- चिकाटी,अभ्यासात सातत्य आणि उपलब्ध संधिचा लाभ घेऊन यश संपादन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाटुळे ज्वेलर्सचे संतोष घाटुळे, निर्मळ ज्वेलर्सचे अंकुश निर्मळ, गोकुळ कुराणाचे अशोक शिंपले, बालाजी वगरे,नानासाहेब कवडे, वाघमोडे,हनुमंत लोकरे,भुजंग लोकरे,पांडुरंग लोकरे ई नी परिश्रम घेतले. डॉ.अशोक शिंपले यांनी सुत्र संचालन केले तर सरपंच संतोष कसपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन