कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.२४ सप्टेंबर हा दिवस दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना दिनाविषयीची प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ताटीपामूल यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी प्रा.अर्चना मुखेडकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व तसेच देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भारतामध्ये 1969 पासून राष्ट्रीय सेवा योजना दिवस २४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश कार्य विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याविषयी प्रा.डॉ.संदीप महाजन यांनी राष्ट्रीय सेवा योजनेविषयीचे महत्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे अधक्ष्य प्राचार्य डॉ.सुनील पवार हे उपस्थित होते तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पल्लवी उंदरे ,प्रा.आर.जे कारकर,प्रा.सुशील जमाले,प्रा.डॉ.विश्वजीत मस्के,प्रा.डॉ.जयवंत ढोले, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे व अधीक्षक हनुमान जाधव,चांगदेव खंदारे,अर्जुन वाघमारे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.संदीप महाजन यांनी मांडले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले