June 21, 2025

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत – डॉ.अंकुश कदम

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन धाराशिव झोनल बॅडमिंटन स्पर्धा-२०२४ (मुले आणि मुली) यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या , उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
    आज विद्यार्थी फक्त पुस्तक,मोबाईल आणि यामध्ये व्यस्त असताना दिसतात.त्यांची सामाजिक,मानसिक आणि बौद्धिक प्रगती पाहिजे तशी होत नाही.ग्रामीण भागात खरे जिद्द आणि जिगर असणारे ध्येयवादी विद्यार्थी आहेत.तेच विभागीय नव्हे तर देशपातळीवर आपल्या खेळातून यशस्वी होत आहेत. परंतु तेवढ्यापुरतेच आमचे विद्यार्थी मर्यादित न राहता त्यांची गुणवत्ता स्पर्धेत दिसून यावी,  महाविद्यालयीन स्तरावरील अशा स्पर्धामधून आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत,” डॉ.अंकुश कदम यांनी मत व्यक्त केले.
    यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.उमाकांत सलगर (धाराशिव जिल्हा क्रीडा समन्वयक, डॉ. बा. आं. आं. म. वि. छत्रपती संभाजीनगर)  उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान , डॉ.कमलाकर जाधव,संयोजक शा. शिक्षण विभाग प्रमुख डॉ. आप्पासाहेब बोंदर,प्रा.सरस्वती बोंदर,समन्वयक प्रा. सुरज गपाट यांची प्रमुख उपस्थितीत होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाचा ध्वज फडकावण्यात आला नंतर मेजर ध्यानचंद आणि संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या स्पर्धेसाठी एकूण ०७ संघांनी आपला सहभाग नोंदवला.मुलांमध्ये व मुलीनं मध्ये श्री माधवराव पाटील महाविद्यालय,मुरूम यांचा संघ प्रथम आला व श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालय , रुईभर हा संघ द्वितीय आला. यावेळी सामन्याचे पंच म्हणून डॉ. प्रदीप इंगळे,डॉ.उमाकांत सलगर, अरविंद शिंदे यांनी काम पाहिले .सूत्रसंचालन प्रा.दत्ता साकोळे यांनी केले . सदर स्पर्धा डिकसळ येथील क्रीडा संकुल शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयांत संपन्न झाली . यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालयातून आलेले विविध खेळाडू संघ आणि क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!