August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 231 कारवाया करुन 1,72,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे: आरोपी नामे-रतन लाला काळे, वय 27 वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर, तेरणा कॉलेच्या पाठीमागे धाराशिव ता.जि. धाराशिव हे दि 22.09.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती संभाजीनगर तेरणा कॉलेज येथे अंदाजे 1,010 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-जमीर सिकंदर हेड्डे, वय 45 वर्षे, रा. बारमाम मोहलृला लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव,अहमद तन्हुमियां मोमीन, वय 33 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा,अतीक मुनीर अरब, वय 35 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा, श्रीहरी विठ्ठल पोतदार, वय 64 वर्षे, रा. मार्डी ता. लोहारा,मोतीराम नंदराम सातपुते, वय 27 वर्षे, रा. नागुर ता. लोहारा, विठ्ठल रावसाहेब विरुदे, वय 45 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा, अरबाज महेबुब पठाण, वय 26 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा, किरण नानासाहेब चव्हाण, वय 27 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव, विकास पंचय्या स्वामी, वय 28 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा, बालाजी विश्वनाथ थोरात वय 40 वर्षे, रा. धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.22.09.2024 रोजी 09.05 ते 12.10 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे टाटा मॅजीक क्र एमएच 25 पी 4163, छोटा हत्ती क्र एमएच 14 ए झेड 7487,छोटा हत्ती क्र एमएच 24 ई 9714, टाटा मॅजीक क्र एमएच 13 एसी 6936,अशोक लिलॅन्ड क्र एमएच 25 एजे 2928,टेम्पो क्र एमएच 25 बी 6993, छोटा हत्ती क्र एमएच 24 एबी 6488,ओमीनी क्र एमएच 24 सी 6187,बडादोस्त क्र एमएच 25 ए जे 4076,ॲपे कृर एमएच 25 एन 631, ही वाहने लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोहारा बसस्थानक व धाराशिव ते बेंबळी जाणारे रोडवर रुईभर पाटी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 10 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-शारुक आल्लाउद्दीन अत्तार, वय 20 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि. 22.09.2024 रोजी 14.15 वा. सु. धाराशिव ते बेंबळी जाणारे रोडवर रुईभर पाटी येथे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर गॅसशेगडी वर निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करुन वडे तळत असताना लोहारा पोलीसांना मिळून आला.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द लोहारा पो.ठा.येथे भा.न्या.सं. कलम- 287 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- आसिफ मजीद शेख, वय 42 वर्षे, रा. रहीमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहते घराचा कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 15.09.2024 रोजी 12.00 ते दि. 21.09.2024 रोजी 17.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 60,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आसिफ शेख यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-बापुराव लिंबाजी सरडे, वय 77 वर्षे, रा. मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे इंदीरानगर मंगरुळ येथील आडत दुकानाचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.21.09.2024 रोजी 20.00 ते दि.22.09.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दुकानातील 11 उडदाचे पोते व रोख रक्कम 14,000₹ असा एकुण 71,750 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बापुराव सरडे यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(1), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- अनिल शंकर मुळे, समर्थ अनिल मुळे, दोघे रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 18.09.2024 रोजी 00.10 वा. सु. दाळींब येथे फिर्यादी नामे- पार्वती मारुती लामजणे, वय 66 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतात मारहाण केल्याचे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन हाताचे हाड फॅक्चर केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पार्वती लामजणे यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-नसीर नजीर कुरेशी, जैनबी नसीर कुरेशी, रुबाबी अत्तार , इब्राहीम सय्यद कुरेशी, मशाक इबृराहीम कुरेशी, सय्यद इब्राहीम कुरेशी इतर एक इसम सर्व रा. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 21.09.2024 रोजी 11.30 वा. सु.डॉ झाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा मुरुम येथे फिर्यादी नामे- नुरअहमद पिरअहमद कानकुर्ती, वय 54 वर्षे, रा. सोलापूर ह.मु. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांना रजिस्टरला सही घेण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मडंळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खुर्ची व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नुरअहमद कानकुर्ती यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 352,351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- परमेश्वर बाबु गायकवाड, सुरज परमेश्वर गायकवाड, दत्तु बाबु गायकवाड, प्रथमेश दत्तु गायकवाड सर्व रा. मातोळा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.09.2024 रोजी 16.00 वा. सु. समाज मंदीर समोर मातोळा येथे फिर्यादी नामे-दिगंबर कोंडीबा भोसले, वय 40 वर्षे, रा.मातोळा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिगंबर भोसले यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- राजेंद्र रावसाहेब निंबाळकर, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी दि.19.09.2024 रोजी 18.00 वा. सु. आळणी शिवारातील शेत गट नं 392 येथे फिर्यादी नामे-रावसाहेब शंकर निंबाळकर, वय 75 वर्षे, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावसाहेब निंबाळकर यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • “रस्ता अपघात.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-लक्ष्मण प्रभाकर घुगे, वय 31 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.19.01.2024 रोजी 08.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी. 8892 वरुन धाराशिव येथुन अणदुर येथे जात होते. दरम्यान नळदुर्ग ते तुळहजापूर जाणारे रोउवर बसवंतवाउी पाटीचे पुढे वळण रस्त्यावर ट्रक क्र टी.एस 07 युसी 4545 चा चालक आरोपी नामे- खॉजा मोईनोद्दीन महमंद रा. काशिपुर कंदिमंडल जि. संगारेड्डी राज्य तेलंगणा यांनी त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून लक्ष्मण घुगे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात लक्ष्मण घुगे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पद्मीणी प्रभाकर घुगे, वय 59 वर्षे, रा. अणदुर ता तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!