September 13, 2026

इतर अनावश्यक खर्च टाळून शाळेस पुस्तक भेट

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक  संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयात “आपले ग्रंथालय,समृद्ध ग्रंथालय “या उपक्रमांतर्गत इयत्ता ७ वी मधील कु.वैष्णवी उत्तम शिंदे या विद्यार्थिनींने आपल्या वाढदिवसा निमित “शिवछत्रपतींचे संस्कार कथा “हे पुस्तक विद्यालयातील ग्रंथालयास भेट देण्यात आले.
    या उपक्रमांतर्गत आतापर्यंत प्रशालेतील ग्रंथालयास वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट देण्यात आले आहेत.
    वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विद्यार्थी प्रशालेतील ग्रंथालयातील पुस्तके घेऊन अवांतर वाचन करू लागले आहेत. त्यामुळे वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.यावेळी प्रशालेच्या वतीने कु.वैष्णवी शिंदे हिस वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,सोलंकर शहाजी,श्रीमती.पांचाळ उषा, श्रीमती.सोनवणे नीता,जाधव मामा व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!