August 8, 2025

“लक्ष्मणा”, एवढया लवकर एक्झिट घेतलीस..!

  • ( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून ०९ सप्टेंबर २०२४) “लक्ष्मणा” काल तू अनंताच्या प्रवासाला निघून गेलास..ही वार्ता मला बदलापूरला समजली.निःशब्द झालो मी..! पण आज सामाजिक उत्थानासाठी राबणाऱ्या हातातील लेखणीला नाही थांबवू शकत.?संसार वेलीचा विचार न करता भाईचारा साबूत ठेवण्यासाठी धावत होतास. एकच लक्ष.. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे काही केलंस ते मानव मुक्तीचे प्रणेते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरूनच.अंतिम संस्काराची तयारी “गुरूनाथदादा पवार”रविंद्रदादा चंदने, “भीमाई” जन्मभूमी पुनर्विकास अग्रणी भाऊसाहेब रातांबेदादा,डॅशिंग शिलेदार अण्णा साळवे , यांच्यासह लोटलेला जनसागर..! मन हाबकून गेलं.! लक्ष्मणराव पवार भावा,तू तरी काय करशील? नियतीचा खेळ..जावच लागलं.! तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करावा लागेल.उगवलेला सूर्य मावळणारच.. पवार परिवाराचा सूर्य अस्ताला गेला.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मौ.डोंगरन्हावे गावातील वंचितांची वेदना बोलक्यांनी संवेदना बनवावी.त्याच विचारांच्या पाऊल खुणावरून मार्गस्थ व्हायला हवं.. बुद्धमं शरणं गच्चामी! धम्मं शरणं गच्चामी!!संघं शरणं गच्चामी.!!! लक्ष्मणराव भावपूर्ण अभिवादन.अखेरचा जयभिम.!@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन.! सोशल मीडिया ठाणे+९३२४३६६७०९
error: Content is protected !!