August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 216 कारवाया करुन 1,90,200 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.08.09.2024 रोजी 17.00 वा. सु.धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत आठवडी बाजार धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-संजय राजाभाउ पेठे, वय 26 वर्षे, रा. नेहरु चौक, शेरखाने गल्ली, धाराशिव, ता. जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. धाराशिव येथील आठवडी बाजार येथे तिन पत्ती मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 900 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.08.09.2024 रोजी 16.30 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत तलमोड येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अर्जुन मुरलीधर साळुंके, वय 32 वर्षे, शंकर एकनाथ सुर्यवंशी, वय 59, अंगद चंद्राम मंडले, लक्ष्मण लिंगाप्पा सास्तुरे, वय 27 वर्षे, शिवराज भास्कर सुर्यवंशी, वय 42 वर्षे, मोहन नारायण व्हनाळे, वय 43 वर्षे, चंद्रकांत गुलाब सास्तुरे, वय 51 वर्षे, पांडुरंग रंजित वाडीकर, वय 49 वर्षे, संजीव राम शिरसे, वय 41 वर्षे, रा. उमरगा जि. धाराशिव हे 16.20 वा. सु. तलमोड येथे तिरट जुगाराचे साहित्यासह 8 मोबाईल व तीन मोटरसायकल असा एकुण 2, 64, 100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-बबन आबा शिंदे, वय 28 वर्षे, रा.पिपळगाव क.,ता. वाशी हे दि.08.09.2024 रोजी 17.51 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 9041 ही भगवती मेडीकल समोर कळंब येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-शांतीलाल भगवान खवले, वय 49 वर्षे, रा. बोरखा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.08.09.2024 रोजी 19.36 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 2731 ही आझाद चौक मंडई पेठ परंडा येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-लाल मोहम्मद गुडसाब नदाब वय 32 वर्षे, रा. नेताजीनगर धाकटा तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, हुजुर मोहम्मद इनामदार, वय 44 वर्षे, रा.तुळजाईनगर धाकटा तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि.08.09.2024 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील हातगाड्या या भवानी रोड तुळजापूर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- गणेश रामा सांगडे, रा. पाचपिपळा ता. परंडा जि. धाराशिव यांनी आपल्या ताब्यातील विना नंबरचे स्वराज 744 हे ट्रॅक्टर हा दि.08.09.2024 रोजी 18.30 वा.सु. खंडोबा मंदीर समोर पाचपिपळा परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना परंडा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भा.न्या. सं. कलम 281, 352अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे:सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर गॅसशेगडी वर निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करणाऱ्यांवर दि.08.09.2024 रोजी 13.10 वा. सु. येडेश्वरी वडापाव सेंटर डिकसळ येथे कळंब पोलीसांनी कारवायी केली. यात आरोपी नामे-सुरज विठ्ठल आळणे, वय 24 वर्षे, रा. डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव हे डिकसळ येथे आपल्या हातगाड्यावर गॅसशेगडीत निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करुन भा.न्या.सं. कलम- 287 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: मयत नामे-ईस्माईल आमिन शेख, वय 32 वर्षे, रा.जळकोट ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.30.08.2024 रोजी 21.30 वा. सु. जळकोट रोडवरुन पायी जात होते. दरम्यान पांडऱ्या रंगाची कार क्र एमएच 16 सीवाय 9567 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून ईस्माईल शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच सदर कार चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेबुब अमिन शेख, वय 35 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.09.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह मोवाका कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत नामे-चंद्रकांत गुलाबचंद शहा, व सोबत पत्नी फिर्यादी नामे- निलम चंद्रकांत शहा, वय 63 वर्षे, मुलगी नामे- नेहा प्रीतम शहा सर्व रा. वसुंधरा अपार्टमेंट, बुधवार पेठ, आर.एम.जी.टी ट्रान्सपोर्ट समोर सोलापूर ता.जि. सोलापूर हे दि.17.08.2024 रोजी 06.10 वा. सु.कार क्र एमएच 13 एन 6570 मधून जात होते. दरम्यान हॉटेल फिश पॉईट जवळ एनएच 52 रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून चंद्रकांत शहा यांचे कारला समोरुन धडक दिली. या अपघातात चंद्रकांत शहा हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर निलम शहा व नेहा शहा हे गंभीर जखमी झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता अपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निलम शहा यांनी दि.08.09.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(2), 125(ए), 125(बी) सह मोवाका कलम 184,187 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे:मयत नामे- रुपाली जिवन पारधे, वय 35 वर्षे, रा. सरडेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हिने दि.28.08.2024 रोजी 20.00 वा.सु. गावातील आपल्या घरी डिझेल ओतुन पेटवून घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- जिवन नागनाथ पारधे रा. सरडेवाडी ता. तुळजापूर (पती) यांनी मागील काही दिवसांपासून लहाण सहाण कारणावरुन पत्नी- रुपाली हिचेसोबत भांडण तक्रारी करुन त्रास देत होता. त्याचे त्रासास कटाळूंन रुपाली हिने डिझेल ओतुन पेटवून घेवून आत्महात्या केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बबन तुकाराम कांबळे, वय 60 वर्षे, रा. धुत्ता ता.जि. धाराशिव यांनी दि.08.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-85, 108 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-इकबाल फतरु शेख, शौकत फतरु शेख, सिकंदर इकबाल शेख सर्व रा. राजुरी ता. जि. धाराशिव यांनी दि. 03.09.2024 रोजी 04.30 वा. सु.राजुरी येथे फिर्यादी नामे- दाउद जानुमियॉ शेख, वय 40 वर्षे, रा. राजुरी ता. जि. धाराशिव यांना शिवीगाळ केल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व लोखंडी पाईपाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दाउद शेख यांनी दि.08.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1)(2), 352, 351(2)(3), 3(5) न्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 35 छापा
    पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल रविवारी दि.08.09.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 35 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 2,910 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 1,076 लि. गावठी दारु, सुमारे 2,145 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 169 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4, 40, 390 ₹ आहे. यावरुन 35 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 35 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)धाराशिव ग्रामीण पो ठाणेच्या पथकाने 6 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-रमेश दादाराव गाढवे, वय 42 वर्षे, रा.वरुडा ता. जि. धाराशिव हे 13.05 वा. सु. मारुती गाडवे यांचे शेडसमोर अंदाजे 1,620 ₹ किंमतीची 18 लिल. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-यादव शेकबा खंडागळे, वय 65 वर्षे, रा.जुनोनी ता. भुम जि. धाराशिव हे 14.00 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,190 ₹ किंमतीची 13 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-भारत राम काळे, रा. शिंदेवाडी ता. जि. धाराशिव हे 16.10 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात अंदाजे 1,460 ₹ किंमतीची 16 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-महेश उर्फ बिंड्या दिलीप हाके, वय 27 वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव हे 16.55 वा. सु.जनता विद्यालयासमोर पत्र्याचे शेडसमोर मोकळ्या जागेत अंदाजे 1,300 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-संगीता नामदेव काळे, वय 58 वर्षे, रा. गावसुद ता.जि. धाराशिव या 16.00 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 18,000 ₹ किंमतीची 300 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-बंडु दत्तु जाधव, रा. गंजेवाडी ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु.कृष्णापान सेंटरच्या मोकळ्या जागेत अंदाजे 875 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 2)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-आकाश तात्याराम डोंगरे, वय 24 वर्षे, रा.वैरागनाका फकिरानगर धाराशिव ह.मु. इंदीरारनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु इंदीरापगर धाराशिव येथे अंदाजे 19,000 ₹ किंमतीचे 190 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • आरोपी नामे-काजल अंकुश काळे, वय 25 वर्षे, रा. झोपडपट्टी गावसुद ता. जि. धाराशिव या 16.00 वा. सु गावसुद झोपडपट्टी येथे अंदाजे 27,800 ₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 70 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-राजेंद्र रघु पवार, वय 40 वर्षे,रा. झोपडपट्टी गावसुद ता. जि. धाराशिव हे 17.30 वा. सु झोपडपट्टी गावसुद येथे अंदाजे 13,400 ₹ किंमतीचे 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 3) भुम पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-कृष्णा नारायण सांगळे, वय 43 वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता. भुम जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. बसस्थानकचे शेजारी शेडचे पाठीमागे अंदाजे 840 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-तानाजी शिवाजी सावंत, वय 44 वर्षे, रा.वालवड, ता. भुम जि. धाराशिव हे 18.15 वा. सु. गारवारा हॉटेलच्या पाठीमागे अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 4)येरमाळा पो. ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-राणीबाई महादेव शिंदे, वय 30 वर्षे, रा. चिमणमाळ पारधीपीडी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव या 08.50 वा. सु गावातील आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे 36,970 ₹ किंमतीची 600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 4 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सिताराम पाराजी शिंपले, वय 49 वर्षे, रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव हे 19.50 वा. सु गावातील आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे 2,580 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 7 बाटल्या व 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 5)धाराशिव शहर पो. ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सिराज नजीर कुरेशी, वय 52 वर्षे, रा. खिरणीमळा धाराशिव ता. जि. धाराशिव हे 12.00 वा. सु बौध्दनगर धाराशिव येथे अंदाजे 6,400₹ किंमतीची 80 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-निलावती सुरेश काळे, वय 42 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव ह.मु. बोंबले हनुमान मंदीर परिसर ता. जि. धाराशिव या 18.25 वा. सु हनुमान मंदीर परिसरात धाराशिव येथे अंदाजे 2,160₹ किंमतीची 27 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लक्ष्मण उत्तम पेटे, वय 66 वर्षे, रा. बौध्दनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु वडगाव शिवारात अंदाजे 525 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 6)तामलवाडी पो. ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-लक्ष्मी राजेंद्र भडांरी रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव या 18.00 वा. सु गावातील आपल्या रहात्या घरासमोर अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 55 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-लिंबाजी थावरु राठोड, वय 65 वर्षे, रा.वडजी तांडा ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर हे 18.02 वा. सु खडकी शिवारात अंदाजे 50,000 ₹ किंमतीचे 1,200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • आरोपी नामे-कालीदास चांगदेव काळे, वय 45 वर्षे, रा.वडगावकाटी पारधीपीडी ता. तुळजापूर हे 18.45 वा. सु गावातील आपल्या रहात्या घराचे समोर अंदाजे 5,400 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 7)कळंब पो. ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अश्विनी बालाजी काळे, वय 30 वर्षे, रा.खडकी रोड डिकसळ पारधीपीडी कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 12.40 वा. सु आपल्या शेडसमोर अंदाजे 5,200 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-बालाजी बन्सी बावळे, वय 58 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे 13.40 वा. सु राज बीयरबार समोर रोडवर पानटपरीचे बाजूला अंदाजे 1,260 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-रामेश्वर एकनाथ आडसुळ, वय 60 वर्षे, रा.ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे 14.50 वा. सु. इटकुर शिवार येथे अंदाजे 2,800 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 40 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 8)परंडा पो.ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सुरेश सरदार काळे, वय 49 वर्षे, रा.जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु गावातील आपल्या रहात्या घराचे बाजूला अंदाजे 4,170 ₹ किंमतीची 29 गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-विष्णु बापु काळे, वय 35 वर्षे, रा. दुधी ता. परंडा जि. धाराशिव हे 18.30 वा. सु संतोष कदम यांचे शेताजवळील ओढ्यात अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 ‍लि. गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 9)तुळजापूर पो.ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-दत्ता राम कांबळे, वय 38 वर्षे, रा.सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 19.30 वा. सु सिंदफळ गावात भिमनगर जाणारे रोडचे बाजूस अंदाजे 5,200 ₹ किंमतीची 65 गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रवि भगवान क्षीरसागर, वय 35 वर्षे, रा. अण्णाभाउ साठे नगर अपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 19.35 वा. सु गावातील आपल्या रहाते घरासमोर अंदाजे 5,500 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 5 सिलबंद बाटल्या व 75 ‍लि. गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 10)वाशी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-शालनबाई रामा शिंदे, वय 42 वर्षे, रा. भैरवनाथ शुगर कारखान्याचे समोर तांदळवाडी शिवार ता. वाशी जि. धाराशिव या 14.40 वा. सु गावातील आपल्या रहाते घराचे पाठीमागे अंदाजे 10,400 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु व 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • 11)शिराढोण पो.ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-संतोष भिमराव राठोड, वय 30 वर्षे, रा. घारगाव तांडा ता. कळंब जि. धाराशिव हे 15.40 वा. सु.गावातील आपल्या रहात्या घरासमोर अंदाजे 21,000 ₹ किंमतीचे 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली
  • 12) ढोकी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे-विश्वंभर भिमा काळे, वय 46 वर्षे, रा. पारधी पीडी तेर ता. जि. धाराशिव हे 13.00 वा. सु तेर येथे अंदाजे 33,600 ₹ किंमतीचे 300 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 13)लोहारा पो.ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-बालाजी कुंडलीक कांबळे, वय 53 वर्षे, रा. भिमनगर कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे 11.40 वा. सु आपल्या रहात्या घरासमोर अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 14)बेंबळी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- सिकंदर बाबु काळे, वय 60 वर्षे, रा.खंडोबानगर झेपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव हे 17.45 वा. सु खंडोबानगर झोपडपट्टी बेंबळी येथे अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 28 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 15) उमरगा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- उसनय्या मारुती तेलंग, वय 25 वर्षे, रा.मारुती पापरी ता. मोहळ ह.मु. डिग्गी रोड ता. उमरगा जि. धाराशिव, विठ्ठल संगमेश्वर वाघमारे, वय 22 वर्ष्ज्ञे, रा. डिग्गी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे 14.30 वा. सु मल्लीनाथ महाराज मठाजवळ पत्र्याचे शेडसमोर डिग्गी येथे अंदाजे 1,52,000 ₹ किंमतीची 1,900 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • 16)आनंदनगर पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- शिवाजी शंकर पवार, वय 37 वर्षे, रा.रामरहिमनगर सांजा ता. जि. धाराशिव, हे 18.35 वा. सु सांजागाव पारधी पीडी येथे रोडलगत अंदाजे 960 ₹ किंमतीची 12 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 17) नळदुर्ग पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- धीरज भिक्कमसिंह परदेशी रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 20.00 वा. सु निसर्ग हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत नळदुर्ग शिवार येथे अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 18) मुरुम पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- गुंडू उमाजी चव्हाण, वय 49 वर्षे, रा. नाईकनगर सु. ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.30 वा. सु देवा पवार यांचे घरासमोर रोडलगत अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 24 लि. गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
error: Content is protected !!