August 8, 2025

कळंब डीजे मुक्त करा अशा घोषणा देत कळंब येथे जनजागृती रॅली

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब शहरात गेल्या काही वर्षापासून सण जयंती उत्सव यामध्ये मोठ्या प्रमाणावर डीजेचा वापर वाढत आहे .डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे कानाचे आजार,बहिरेपणा,लेझर किरणामुळे डोळ्याचे आजार,
    अंधत्व व हृदयाचे आजार,हार्ट अटॅक मुळे जीव गमवावा लागत आहे. यापासून आपला बचाव झाला पाहिजे,सावध राहिले पाहिजे यासाठी शहरातील जयंती,उत्सव व सण मिरवणूक प्रसंगी डीजे ऐवजी परंपरागत वाद्याचा वापर करा हा संदेश घेऊन कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील विविध वयोगटातील नागरिकांचा सहभाग असलेल्या जनजागृती रॅलीचे आयोजन दि.१० सप्टेंबर रोजी करण्यात आले.रॅलीच्या सुरुवातीस कळंब नगर परिषद कार्यालयासमोरील हुतात्मा स्मृती स्तंभास कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार,कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,मराठवाडा प्रदेश कार्यकारणी सदस्य डी. के. कुलकर्णी, eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युतराव माने यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पहार अर्पण करण्यात आला राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर ही रॅली अहिल्याबाई होळकर चौक,मेन रोड,सराफा लाईन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक ( ढोकी रोड ) मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये कळंब शहरातील सामाजिक ,शैक्षणिक तसेच पत्रकार क्षेत्रातील मान्यवर यांचा सहभाग होता.
  • यात विलास मिटकरी ,पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे अनंत घोगरे,शिवाजी गिड्डे, अनिल यादव,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,शितल धोंगडे ,अमर चोंदे,संदीप कोकाटे,सचिन क्षिरसागर,विनायक दशरथ ,बशीर पठाण, गुलाब बागवान,अनिरुद्ध पवार,पोलीस नाईक श्रीराम मायंदे,कदम,शिंदे पोलीस पाटील शिवाजी गायकवाड ,कोल्हे ,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे एनसीसी विभागाचे विद्यार्थी , सावित्रीबाई फुले विद्यालय विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक प्रतिभा गांगुर्डे,काकासाहेब मुंडे, सोमनाथ सावंत,विद्याभवन हायस्कूल विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक ए.व्ही.वाघमोडे ,आर.बी. कोल्हे ,कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक प्रशांत भोळे,प्रतीक्षा पटेल,नितीन सावंत,सुजित माने जि.प.प्रशाला मुलांची,विद्यार्थी व विद्यार्थिनी,मुख्याध्यापक शब्बीर अन्सारी,मॉडेल इंग्लिश स्कूल विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक बाळासाहेब मुळे,बसवेश्वर शिंगणापुरे यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!