कळंब – येथील अप्टेक काँम्प्युटरचे समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.संजय घुले यांचे वडील दशरथ घूले (वय ८५) यांचे दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १.०० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. दशरथ घुले हे नगर परिषद कळंब येथील कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त लेखापाल होते. त्यांच्या निधनामुळे घुले परिवार, मित्र परिवार आणि परिसरात दुःखाचे सावट पडले आहे. मांजरा समशानभूमीवर ६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात