August 9, 2025

विद्याभवन हायस्कूल विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

  • कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूलमध्ये दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ.राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शिक्षक दिन म्हणून तसेच स्त्री शिक्षणाचे व बहुजनांच्या शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या आदर्श शिक्षक दांपत्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्मरणात ठेवून आज विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा केला.
    यासाठी आठवी ‘ अ ‘ च्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा धारण करून प्रशालेत परिपाठाच्या वेळी नाटिकेचे सादरीकरण पण केले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळाचे संचालक पवार व्ही.एस. यांच्या हस्ते डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक यांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
    कार्यक्रम पार पाडण्यासाठी आठवी अ च्या वर्गशिक्षिका रेखा भोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!