उदगीर (जिमाका) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी लातूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर येथे होणा-या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई येथून सकाळी ०९.२०वा. लातूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता उदगीर येथील छत्रपती शाहू महाराज सैनिक स्कुल आवलकोंडा रोड येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यानंतर मोटारीने बुध्द विहार, उदगीरकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी १०:४५ वाजता राष्ट्रपती महोदयांचे बुध्द विहार येथे आगमन व राखीव राहतील. त्यानंतर ११:४५ वाजता राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होणा-या विश्वशांती – बुध्द विहार लोकार्पण सोहळाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १२ वाजता उदयगिरी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमास्थळाकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी १२ :२५ वाजता शासन आपल्या दारी व महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सायंकाळी ४ वाजता हेलिपँडकडे प्रयाण होईल. सायंकाळी ४:२० वाजता छत्रपती शाहू महाराज सैनिक स्कूल,आवलकोंडा रोड उदगीर येथे आगमन व त्यानंतर हेलिकॉप्टरने लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५ वाजता लातूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे