कळंब (माधवसिंग राजपूत) – संत श्री सेना महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी वार शुक्रवारी सकाळी पुण्यतिथी निमित्त कळंब शहरातील मुख्य मार्गावरुन ह.भ.प.गणेश महाराज काळेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा दिंडी काढण्यात आली.यामध्ये नाभिक समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते.बाल वारकऱ्यांनी आपल्या भजनात सर्व बांधवांना मंत्रमुग्ध केले, यावेळी फुगडी चा ठेका बांधवांनी धरला होता. ह.भ.प.बलभीम महाराज धाकतोडे यांचे प्रवचन झाले. आम्ही वारीक ,वारीक हजामत करु बारीक , यावेळी अनेक अभंग घेण्यात आले, तसेच संत सेना महाराजांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. दुपारी बारा वाजता महाराजांच्या मुर्तीवर गुलाल पुष्पवृष्टी करण्यात आली.नंतर संत श्री सेना महाराज अभंग गाथा डॉ.भागवत राऊत यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . दशरथ किसनराव मंडाळे यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेमचंद गोरे, विष्णू मंडाळे, कल्याण मंडाळे, बापुराव सुरवसे, सतिस गोरे,राजे सावंत, युवराज पंडित, ओंकार मंडाळे,सुरज मंडाळे,आबासाहेब मंडाळे, रणजित शेंद्रे, जयराम राउत,महेश काळे, मुन्ना काळे, विनायक माने, अमोल सुरवसे,योगेश करवलकर, सिद्धेश्वर डिगे, श्रीकृष्ण अंबुरे, लिंबराज देवकर,आदि नाभिक बांधवांनी परीश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले