August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भाटशिरपुरा येथे अभिवादन

  • भाटशिरपुरा – निजाम काळात ग्रामीण भागात दळणवळणाची कसलेही साधने नसतानाही शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बहुजनांच्या मुलांसाठी सन १९५१ मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांनी तालुक्यातील मोहा येथे शाळेची स्थापना केली होती.
    अशा थोर त्यागी,तपस्वी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी ३३ वी पुण्यतिथीचे औचित्य साधून कै.नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा येथे प्रतिमेस मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरुजींच्या कार्याची माहिती दिली.
    यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!