कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता कक्ष व राष्ट्रीय छात्र सेना तसेच अँटी रॅगिंग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग कायदे व सुरक्षा या विषयावर ॲड.तानाजी चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
त्यात ते बोलताना म्हणले की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची, भयाची,किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल,असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कृत्य करणे म्हणजे रॅगिंग अशी व्याख्या कायद्यात करण्यात आली आहे.कोणी व्यक्ती शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या बाहेर एखाद्या विद्यार्थ्याला रॅगिंग (ragging)करत असेल,ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीला साथ देणारे आणि रॅगिंगचा (ragging)प्रचार करणारे सर्व विद्यार्थी यामध्ये दोषी धरले जाऊ शकतात.यासंदर्भात अपराध सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंतच्या कारावासची शिक्षा होऊ शकते.तसेच दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.आणि विविध आठ कलमविषयी माहिती दिली तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार,रॅगिंग रोखण्याची प्राथमिक जबाबदारी स्वतः शैक्षणिक संस्थेची आहे,विद्यार्थी आणि पालकांना यातील अत्यंत अनैतिक बाजूबद्दल संवेदनशील करून,विद्यार्थ्यांना सावध करून रॅगिंगमध्ये गुंतल्याने त्यांची सर्व कारकीर्द उद्दिष्टे धोक्यात येऊ शकतात,आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आणि अभिमुखता कार्यक्रम घ्यावे असे असे प्रतिपादन केले.आणि रॅगिंगला शून्य सहिष्णुता! कोणत्याही स्वरुपात रॅगिंग करण्यासाठी एक फर्म NO!! ठेवावा असे सांगितले ,अंटीरॅगिंग सप्ताहात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, आणि विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले त्यात भित्ती पत्रक विजेते कु. सृष्टी दीक्षित(प्रथम),कु. मयुरी नागटिळक(द्वितीय) ,धम्म रक्षिता गरड(तृतीय) निबंध स्पर्धेतील विजेते सुप्रिया पवार(प्रथम), तेजस्विनी गुजर(द्वितीय) पांचाळ,ज्ञानेश्वरी(तृतीय),पथनाट्य स्पर्धेतील विजेते ओंकार खंडागळे आणि संघ(प्रथम),दृष्टी कोठावळे आणि संघ(द्वितीय),संकेत काकडे आणि संघ(तृतीय) या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी अँटीरंगिंग समिती विषयी माहिती आणि हानिकारक परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण केली.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर यांनी कार्यक्रमाची उद्धिष्ट आणि सप्ताह साजरा कसा केला याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता कक्ष सदस्य डॉ.दत्ता साकोळे प्रास्ताविक डॉ.पावडे,आणि आभार डॉ.राठोड यांनी मांडले.या शिबिराचे संयोजन डॉ.पावडे ,डॉ. जाधव,डॉ.भोसले यांनी केले.या प्रसंगी,प्रो.चिंते,प्रो. गुंडरे,प्रो.सूर्यवंशी,डॉ.चांदोरे, प्रा. अंकुशराव, डॉ.आदाटे, डॉ. मस्के, डॉ.जाधव , डॉ. उंदरे,प्रा.वाळके,प्रा.शेख हे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशवीरित्या पार पाडण्यासाठी सहायक ग्रँथपाल अरविंद शिंदे,अधीक्षक हणमंत जाधव,इक्बाल शेख ,जया पांचाळ ,संदीप सूर्यवंशी,विद्यार्थी प्रतिनिधी झीनत मुल्ला,योजना गायकवाड,आणि वैष्णवी लांडगे यांनी परिश्रम केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले