August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात आपत्तीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आपत्तीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
    या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.बालाजी वाघमारे यांनी मराठवाडा या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, कोरडा दुष्काळ या सारख्या आपत्तीला तोंड देण्यासाठी कशा प्रकारची तयारी करावी लागेल व कोणत्या उपाययोजना राबवाव्या लागतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच अचानक उद्भवलेला आपत्तीला तोंड देण्यासाठी काय प्रात्यक्षिक ही करून दाखविले.या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पवार,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.संदीप महाजन, प्रा.डॉ. पल्लवी उंदरे,प्रा.डॉ.राघवेंद्र ताटीपामूल, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,कार्यालय अध्यक्ष हनुमंत जाधव,प्रयोगशाळा परिचारक अर्जुन वाघमारे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत सूत्रसंचालन डॉ. राघवेंद्र ताटीपामूल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.पल्लवी उंदरे यांनी केले.
error: Content is protected !!