उमरगा – वात्सल्य ट्रस्ट मुंबई आणि समाज विकास संस्था उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी ड्रायव्हिंग प्रशिक्षण कोर्स उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील विविध गावातून एकूण ५१ युवकांचे ऍडमिशन करण्यात आले असून उमरगा येथे उद्घाटनाचा कार्यक्रम प्रसन्न झाला.उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकअश्विनीताई भोसले,प्रा.प्रभाकर कावळे,ज्योती कावळे,पत्रकार अमोल पाटील, समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना पीआय अश्विनी भोसले ह्या म्हणाल्या की,उपजीविकेसाठी सर्वांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन नियमांचे काटेकोरपणाने पालन करावे.आपल्या हातातून चूक होणार नाही यासाठी खास विशेष काळजी घ्यावी.प्रशिक्षण पूर्ण करावे आणि आपल्या कुटुंबासाठी मदत व्हावी.अशी भावना पी.आय अश्विनी भोसले यांनी व्यक्त केली.याप्रसंगी भूमिपुत्र वाघ यांनी समाज विकास संस्था आणि वात्सल लेटर मुंबई यांचे नेमके कार्य काय आहे ते कोणासाठी काम करतात याबद्दल सविस्तर मांडणी केली. सोबत जीवनातील मूल्य आणि गेल्या पंचवीस वर्षाचा कार्य आढावा ज्योतीताई कावळे यांनी मांडला.प्रभाकर कावळे जीवनाचे महत्त्व,नियमावली आणि जगण्याची रीत या विषयावरती मार्गदर्शन केले.तर अमोल पाटील यांनी कार्यरत असणाऱ्या समाज विकास संस्थेच्या बद्दल मांडणी केली.प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या जीपची पूजा करण्यात आली.त्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम कुलकर्णी ट्रॅव्हलिंग स्कूल आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.. सूत्रसंचालन प्रशांत ढवळे यांनी मांडले.तर आयोजनाचे कार्य कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूलचे संयोजक देवणीकर यांनी केले.
More Stories
शब्द नवे,अर्थ नवे! युवा कवींच्या काव्यदीप संमेलनाने उमरगा काव्यमय!
स्वयंसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऱ्हासाची कारणे.
बालसंरक्षणाची बांधिलकी दृढ— बहुजन हिताय वसतिगृहात मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न