
*सामाजिक कार्यातील वारसा दुसऱ्या पिढीकडे
- उमरगा – येथील श्री.निळकंटेश्वर यात्रा महोत्सव किल्लारी या ठिकाणी दरवर्षाला विविध क्षेत्रातील नामवंतांचा,गुणवंतांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.खुशी फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत उमरगा- लोहारा तालुक्याचे लाडके आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन निखिल भूमिपुत्र वाघ यांना खुशी फाउंडेशन यांच्यावतीने मानपत्र,शाल,श्रीफळ हार देऊन सन्मानित करण्यात आले.
निखिल वाघ हे आई-वडिलांचा सामाजिक क्षेत्रातील वारसा पुढे चालवीत आहेत.ही अभिमानाची बाब आहे.असे गौरव उद्गार ज्ञानराज चौगुले यांनी केले म्हणुन त्यांचे कौतुक परिसरातून होत आहे.
कोविड १९ या जागतिक महामारी मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटका राज्यामध्ये ४५ हजार कुटुंबांना रेशनची मदत केली.मुंबई मध्ये गोवंडी परिसरातील झोपडपट्टी,तसेच नागपूर,धाराशिव जिल्ह्यातील उमरगा,लोहार,आणि कळंब तालुक्यात राहणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास लोकांना रेषांची मदत करण्यात आली.
तसेच नागपूर आणि गोवंडी या ठिकाणी महिलांना छोट्या छोट्या उद्योगाचे प्रशिक्षण आणि अर्थसाह्य देऊन छोट्या उद्योगांना चालना दिली.महाराष्ट्र कर्नाटक मध्ये एक एक याप्रमाणे दोन ऑक्सिजन प्लांट उभा करून दिले.धाराशिव,बीड,नागपूर,पुणे अशा विविध ठिकाणी शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या साहित्याची मदत केली. त्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर,पीपी किट,कॉट,बेड,मास्क जी जी साधनं उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय यास कमी असतील ती ती साधने पुरविण्याचे महान कार्य समाज विकास संस्था,महाराष्ट्र लोकविकास मंच,ऑक्सफॅम इंडिया,स्माईल फाउंडेशन यांच्या मदतीतून कार्य केले.अशा या मरण पाठीवर बांधून कार्य केलेल्या,सावित्री माता फुले यांचा वारसा जपत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी सामाजिक क्षेत्रात पदार्पण केले.सामाजिक कार्य करत असताना आणिक फायनान्शिअल सर्विसेसची स्वतंत्र शाखा विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्याखाली स्थापन करून आज किमान तीनशे महिलांना अर्थसहाय्य देण्याचं विशेष कार्य सुरू केलं आहे.
या कार्याचा आढावा घेऊन खुशी फाउंडेशनच्या वतीने दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी निखिल भूमिपुत्र यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खुशी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
शब्द नवे,अर्थ नवे! युवा कवींच्या काव्यदीप संमेलनाने उमरगा काव्यमय!
स्वयंसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऱ्हासाची कारणे.
बालसंरक्षणाची बांधिलकी दृढ— बहुजन हिताय वसतिगृहात मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न