August 8, 2025

साडे तेराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सामान्य ज्ञान परीक्षेस प्रतिसाद

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) परीक्षेचे आयोजन केले होते.

  • “ज्ञानदीप लावू जगी” हा विचार उराशी बाळगून मोहेकर गुरुजींनी (आण्णांनी) गोरगरीब विद्यार्थ्यांच्या घरोघरी शिक्षणाची गंगा पोहचविण्याचे समाजोपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा वसा अखंडीत पुढे चालू ठेवण्यासाठी स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी सक्षमपणे टिकावा या उद्देशाने कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ही सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा कळंब तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते.

  • या स्पर्धेला शालेय स्तरापासून ते महाविद्यालय स्तरापर्यंत भरघोस असा प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेची तीन गटात विभागणी केली. ‘अ’गट शालेय गट इयत्ता चौथी ते सातवी, ‘ब’ गट इयत्ता आठवी ते दहावी,क गट महाविद्यालयीन गट अशी वर्गवारी केली होती.
    एकूण १३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्याने आपला सहभाग नोंदवला होता.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला.या परीक्षेत विजयी प्रथम,द्वितीय,तृतीय
    विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे.

  • याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रोटे अरविंद शिंदे व सचिव रोटे अशोक काटे व प्रोजेक्ट चेअरमन डॉ.संजय सावंत यांनी परिश्रम घेतले तसेच ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या परीक्षेमध्ये रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या सदस्यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
    शेवटी राष्ट्रगीताने या स्पर्धा परीक्षेचे सांगता करण्यात आली.

 

error: Content is protected !!