उमरगा – समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत विधवा, परित्यक्ता,कुमारी माता आणि उपेक्षित घटकांच्या आयुष्यात नवी पहाट उगवण्याचे कार्य समाज विकास संस्था सातत्याने करत आहे.याच सामाजिक बांधिलकीतून दि.३ एप्रिल २०२६ रोजी उमरगा येथील संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात गुंजोटी येथील सागर म्हेत्रे आणि समीक्षा म्हेत्रे यांचा पुनर्विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. हा विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नवा अध्याय नसून सामाजिक परिवर्तनाचा ठोस संदेश देणारा ठरला.शिवधर्म पद्धती आर्य समाज पद्धतीचा संगम साधत ‘शिवविवाह’ पद्धतीने हा लावण्यातउमरगा – समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत विधवा, परित्यक्ता,कुमारी माता आणि उपेक्षित घटकांच्या आयुष्यात नवी पहाट उगवण्याचे कार्य समाज विकास संस्था सातत्याने करत आहे.याच सामाजिक बांधिलकीतून दि.३ एप्रिल २०२६ रोजी उमरगा येथील संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात गुंजोटी येथील सागर म्हेत्रे आणि समीक्षा म्हेत्रे यांचा पुनर्विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. हा विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नवा अध्याय नसून सामाजिक परिवर्तनाचा ठोस संदेश देणारा ठरला.शिवधर्म पद्धती आणि आर्य समाज पद्धतीचा संगम साधत ‘शिवविवाह’ पद्धतीने हा विवाह लावण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.कल्पना वाघ यांनी कन्यादानाचे पवित्र कार्य पार पाडले.
समारंभात बोलताना ॲड.मंगेश येळीकर यांनी शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील विषमता कमी करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.विधवा, परित्यक्ता आणि कुमारी मातांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी पुनर्विवाहाची चळवळ अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.भूमिपुत्र वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या समतावादी विचारांचा उल्लेख करत धर्मव्यवस्थेतील जाचक अटींमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगितले आणि भविष्यात अशा पुनर्विवाहांचे आयोजन सातत्याने केले जाईल तसेच त्याचा संपूर्ण खर्च संस्था उचलणार असल्याची माहिती दिली. या मंगल सोहळ्यास उमरगा व गुंजोटी परिसरातील नागरिक, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य,अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचे पदाधिकारी,नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज जाधव,अस्मिता सुरवसे,शितल गहेरवार,अक्षय कांबळे आणि रंजना यांनी विशेष परिश्रम घेतले. समाज विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा संदेश अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.कल्पना वाघ यांनी कन्यादानाचे पवित्र कार्य पार पाडले. समारंभात बोलताना ॲड.मंगेश येळीकर यांनी शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील विषमता कमी करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.विधवा, परित्यक्ता आणि कुमारी मातांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी पुनर्विवाहाची चळवळ अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.भूमिपुत्र वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या समतावादी विचारांचा उल्लेख करत धर्मव्यवस्थेतील जाचक अटींमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगितले आणि भविष्यात अशा पुनर्विवाहांचे आयोजन सातत्याने केले जाईल तसेच त्याचा संपूर्ण खर्च संस्था उचलणार असल्याची माहिती दिली. या मंगल सोहळ्यास उमरगा व गुंजोटी परिसरातील नागरिक,मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य,अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचे पदाधिकारी,नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज जाधव,अस्मिता सुरवसे,शितल गहेरवार,अक्षय कांबळे आणि रंजना यांनी विशेष परिश्रम घेतले. समाज विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा संदेश अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
More Stories
उमरग्यात शाक्यसम्राट राजा अशोक व कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा
संप्रदायासोबत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी राहावी – आकांक्षा चौगुले