उमरगा (अविनाश घोडके ) – बहुजन विचारसरणीचा जागर जागवणारा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा कार्यक्रम म्हणून बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह, उमरगा येथे सम्राट अशोक जयंती व बहुजन क्रांतिनायक कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्ममित्र वगरसेन कांबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्ममित्र विबोध उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र उत्तम गायकवाड यांनी केले,तर आभार अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी मानले. कार्यक्रमात सम्राट राजा अशोक व कांशीराम यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.उत्तम गायकवाड व धम्ममित्र विबोध यांनी सम्राट अशोक यांच्या धम्म, शांतता आणि लोककल्याणकारी विचारांवर प्रकाश टाकला.तसेच अध्यक्ष वगरसेन कांबळे यांनी कांशीराम यांच्या बहुजन चळवळीतील योगदान,संघटन कौशल्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना सामाजिक भान,समता,बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व यांची जाणीव करून देण्यात आली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शान गायकवाड (इ.१० वी),संघर्ष गायकवाड (इ.१० वी),सागर सास्तुरे,विष्णू गाडेकर (इ.७ वी),संघपाल लोंढे (इ.८ वी) या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.
More Stories
पुरोगामी विचारांची नवी दिशा; समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा
संप्रदायासोबत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी राहावी – आकांक्षा चौगुले