धाराशिव (जिमाका)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने दि. १४ ऑगस्ट रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब अंबेडकर चौक ते महात्मा जोतीबा फुले चौक ते लहुजी वस्ताद चौक ते परत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या प्रमाणे रॅलीचे आयोजन करण्यांत आले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्राघ्यापक,राष्ट्रीय छात्र सेना व एन एन एस व इतर विद्यार्थी मिळून २०० विद्यार्थी सहभगी झाले होते.५० होमगार्ड व जिल्हयातील ३० खेळाडू उपस्थितीत होते.रॅलीमघ्ये धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.हरनाळे सहभागी होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला