धाराशिव (जिमाका) – इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देवून त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याकरिता तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा 15 ऑगस्टपासून 3 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्हयात तालुकानिहाय मेळावे पुढीलप्रमाणे आहेत.16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन सभागृह धाराशिव,20 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालय,21 ऑगस्ट रोजी वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय रुई रोड,परंडा, 22 ऑगस्ट रोजी आदर्श महाविद्यालय उमरगा,23 रोजी कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी,26 ऑगस्ट रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय,लोहारा,27 आणि 29 ऑगस्ट रोजी अनुक्रमे शंकरराव पाटील महाविद्यालय भुम व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जिल्हयातील विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक बी.जी.अरवत यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला