August 9, 2025

वर्षावास प्रवचन मालिका संपन्न

  • मुंबई – भारतीय बौद्ध महासभा महात्मा जोतिबा फुले नगर वार्ड ११६ येथे वर्षावास प्रवचन मालिका २०२४ चे दुसरे पुष्प विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती गती मान कशी करावी हा महत्वपूर्ण विषय केंद्रीय शिक्षक रवींद्र गवई गुरूजी यांनी उत्तम प्रकारे समजून सांगितला. त्या नंतर वर्षावास प्रवचन मालिकेचे अध्यक्ष भास्कर हजारे यांनी त्यांचे पुष्प देउन स्वागत केले व या कार्यक्रमाचे दान दाते संजिवनीताई मधुकर सावंत यांनी धम्म दान देऊन त्यांचे स्वागत केले व उपस्थितांना खिरदान करून संतुष्ट केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुंदर जानराव गुरूजी यांनी पार पडले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती समाज भुशन अनिल लोखंडे, पंचशील बुद्ध विहार अध्यक्ष सर्जेराव गवई, यशोधरा बुद्ध विहार अध्यक्ष आनिता ताई भदरगे उपस्थित होते.
    या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!