मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च विद्यालयातील नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलिस भरतीमध्ये बीड जिल्ह्यात पोलिस म्हणून नियुक्ती मिळालेल्या वैष्णवी उद्धव माळी या माजी विद्यार्थिनीचा सत्कार मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वैष्णवी माळी म्हणाली, आपण एखादी गोष्ट मनापासून ठरवली व त्याला प्रयत्नांची जोड दिली तर कुठलेही यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. पहिल्याच प्रयत्नात पोलिस भरतीत यश मिळवणाऱ्या वैष्णवीने सांगितले की यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन व भरपूर कष्ट करून आपण अपयशाची पायरीच काढून टाकली पाहिजे. प्राचार्य संजय जगताप यांनी वैष्णवीच्या यशाबद्दल तिचे कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले व शेवटी आभार प्रा.नवनाथ करंजकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न