धाराशिव (जिमाका) – इंडिया पोस्ट ऑफिसच्या नावे मोबाइलवर फसवणुकीचे / फ्रॉड संदेश,कॉल आणि वेब लिंक येत आहेत.ज्यामध्ये पत्ता अपडेट करणे किंवा बँक खाते अपडेट करण्यासंदर्भात चौकशी करण्यासह वेबलिंक पाठवली जात आहे.त्याव्दारे ओ.टी.पी.विचारला जाउन जनतेची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत असून यापासून जनतेने सावध राहावे.असे आवाहन भारतीय डाक विभागाने केले आहे.
मात्र अशा कुठल्याही प्रकारचे एसएमएस,कॉल किंवा वेबलिंक भारतीय डाक विभागाकडून पाठवले जात नसून कुठल्याही प्रकारचा ओटीपी भारतीय डाक विभाग मागत नाही.यामुळे जनतेने यापासून सावधान राहून आर्थिक फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे इंडिया पोस्ट ऑफिससंदर्भातील असे मोबाइलवर खोटे,फसवणुकीचे/फ्रॉड संदेश,कॉल आणि वेब लिंकला जनतेने प्रतिसाद देऊ नये.असे आवाहन धाराशिव डाक विभाग अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा
सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी