May 11, 2026

जय भवानी विद्यालयात निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग

  • पारा – साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिम्मित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संदीप भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पारा येथील जय भवानी विद्यालयात नालंदा वाचनालयाच्या वतीने निबंध स्पर्धा संपन्न झाली.
    निबंध स्पर्धेत जय भवानी विद्यालय पारा येथुन इयत्ता ५वी ते ७वी च्या २०,आणि ८ वी ते १० वीच्या २५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण १५ ऑगस्ट रोजी होईल.
    ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय गवळी, कृष्णा शिनगारे, दिपक सिरसट, सुधीर शिनगारे, मयुर जाधव, सुमित विजय गवळी यांनी विशेष प्रयत्न घेतले. नालंदा वाचनालय समितीच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धेची आखणी करण्यात आली होती. जय भवानी विद्यालय पाराचे प्रभारी मुख्याध्यापक भराटे एस. डी, मराठी विभाग प्रमुख श्रीमती मेटे एस.व्ही,दीपक मुळे व सर्व शिक्षक वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.
error: Content is protected !!