कळंब – बजरंग ताटे श्रमिक मानवाधिकार संघ महिला अधिकार आंदोलन यांचा जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने जागतिक आदिवासी दिनानिमित्त सन्मानित,संविधानातील,न्याय,स्वातंत्र्य, समानता बंधुता,या धाराशिव जिल्हा सह मराठवाड्यातील दलित,आदिवासी, पारधी,समाजाचे श्रमिक कष्टाने थकणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी पारधी,वंचित, पिढीत,महिला,पुरुष यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी न्याय, स्वातंत्र्य,समता,बंधुत या मूल्यासाठी रस्त्यावर झगडून शासन दरबारी पारधी समाजाच्या न्याय हक्क प्रश्नाची मांडणी करणारे बजरंग ताटे यांना संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव संभव प्रतिष्ठान केशेगाव यांच्या वतीने 9 ऑगस्ट 2025 रोजी साहित्य सूर्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे ,प्रवीण स्वामी आमदार,उमरगा लोहारा यांच्या हस्ते तर रामचंद्र अलोरे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अनुदुर, संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव चे दयानंद काळुंखे,संभव प्रतिष्ठान केशेगावचे तुकाराम शिरसागर,यांच्या उपस्थितीमध्ये साई मंगल कार्यालय ईटकळ ता.तुळजापूर येथील साई मंगल कार्यालय येथे, जिल्हास्तरीय समाजसेवा पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व स्तरातून बजरंग ताटे यांचे अभिनंदन होत आहे.
More Stories
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन
ग्रंथालयाच्या अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – प्रा.डॉ.धर्मराज वीर