August 9, 2025

धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी

  • तुंबलेल्या नाल्या तत्काळ स्वच्छ कराव्यात
  • धाराशिव – शहरातील ख्वॉजा नगर ते उमर मोहल्ला या भागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.ते उचलावे तसेच त्या भागातील नाल्या तुंबल्या असून त्या तात्काळ स्वच्छ कराव्यात. विशेष म्हणजे शहरातील कचरा डेपोतील दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा शहरवासियांना त्रास होत आहे. त्यामुळे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावून तो कचरा डेपो तात्काळ इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) च्यावतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारि नीता अंधारे यांच्याकडे दि.८ ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
    दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर,उमर मोहल्ला,गणेश नगर,फकीरा नगर, तुळजापूर नाका,जुना बस डेपो, इंगळे गल्ली,देशपांडे स्टॅन्ड,अगड गल्ली या भागातील नागरिकांसह शहरवासियांना या कचरा डेपोतील दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा प्रचंड त्रास होत आहे.खीरणी मळा,रसूलपुरा व लहुजी चौक या भागामध्ये रस्ते व नाली करण्यात यावी.तर तुंबलेल्या नालीमधील कचरा काढून तो उचलून स्वच्छ करण्यासह पोलवरील लाईट सुरू कराव्यात.तसेच हजरत ख्वॉजा शमशोद्दीन जवळील कब्रस्तानजवळील (मुस्लिम स्मशानभूमी) मध्ये एक मिनार मज्जिद पासून नाला तयार करून स्मशानभूमीत लाईट बसवून साफसफाई करण्यासह दर्गाह परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे.तर खडकपुरा येथे उजनीची आमांकीत योजनेतून मंजूर झालेली पाईपलाईनची कामे ताबडतोब करावीत.त्याबरोबरच उजनीचे पाणी किमान दोन दिवसाआड पुरवठा करण्यात यावा. तसेच रसुलपुरा भागातील उर्दू शाळेवरून,नागनाथ रोड व बौद्ध नगर या भागातील अनेकांच्या घरावरून लाईटच्या तारा ओढलेल्या त्या तारा काढून टाकाव्यात.महत्वाचे म्हणजे शहरातील मोकाट कुत्रे व डुकरे यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावर शिवसेना (ठाकरे) चे कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शौकत शेख, अबरार कुरेशी, शिवसेना अल्पसंख्या विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष तौफीक काझी, शहराध्यक्ष इरफान शेख,सलमान शेख,मोहम्मद शेख,जावेद शेख, सलमान मुलाणी,जैनु शेख, नय्युम,अरिफ शेख मोसिन शेख, अजहर पठाण,अरबाज शेख, अब्बास पठाण,सलमान शेख, मुईज सय्यद,शायर मुलाणी,समीर शेख,फैसल बागवान,फैजल पठाण,इम्रान बागवान,अमजद शेख,मेहबूब शेख,हैदर काझी यांच्या सह्या आहेत.
error: Content is protected !!