धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दि.9 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भास्करराव नायगावकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिलीप गणेश,सुरेश धारूरकर,ॲड.सुग्रीव नेरे,अरुण माडेकर,बालाजी जाधव,धनंजय माळी आदींची उपस्थिती होती. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांनी विद्यार्थ्यांना तन, मन,धनाने देशासाठी योगदान देण्याचे आवाहन केले तसेच आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व सांगून शाळेला मल्लखांब भेट दिला.सचिव दिलीप गणेश यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली.त्यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेस कमिटीच्या भारत छोडो आंदोलनाचा संदर्भ देत महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्याचे महत्व स्पष्ट केले. 9 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर झालेल्या वंदे मातरम घोषणांमुळे जनसागर उसळला आणि इंग्रज सरकारने त्याचा धसका घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे सुरेश धारुरकर यांनी स्वातंत्र्य संग्रामातील बलीदानाचे स्मरण केवळ स्मृतिदिनापुरते मर्यादित न ठेवता ते कायम जपण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले क्रांती दिना बद्दल भाषण देत मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पंडित जाधव यांनी केले.सूत्रसंचालन चंद्रकांत माळी तर आभार प्रदर्शन रमण जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली.यावेळी दोन्ही शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ